पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दणका; विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात केली ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ..

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहिल्यानगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असुन, विद्यापीठाने त्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.परंतु विद्यापीठाने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना चांगलाच दणका दिला आहे.परीक्षा शुल्कात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने परीक्षा शुल्कात 20 टक्क्याने वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा वाढीव भार पडला आहे. याबाबत विद्यापीठातर्फे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत २०१८ ते २०२० मध्ये 15 टक्के शुल्क वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र कोरोना काळात शुल्कवाढ करणे संयुक्तिक नसल्याने विद्यापीठाकडून शुल्क वाढ करण्याता निर्णय मागे घेण्यात आला होता.सुमारे सात वर्षांपासून विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केली नव्हती. परंतु २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. या शुल्क विद्यार्थ्यांवर भार पडला आहे.
दरम्यान एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. दुसरीकडे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार वाढवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत परीक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
