पुणेकरांनो काळजी घ्या! लोहगावात सर्वाधिक तापमान, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती..


पुणे : पुणेकरांना उष्णतेचा जबरदस्त चटका बसत असून, लोहगावमध्ये तापमान ४२.९ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने शहरात ‘हिटवेव अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुण्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून शिवाजीनगर आणि लोहगाव हवामान केंद्रांनी दिलेल्या अहवालानुसार तापमानाने ४२.१ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे.

दिवसा वाढलेल्या झळांमुळे केवळ कमाल तापमान नव्हे, तर किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीसुद्धा उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवस पुण्यात तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान राहणार आहे.

दरम्यान, हवामान विभागाने सांगितले की, २२ एप्रिलनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु त्याआधी नागरिकांनी दुपारी घराबाहेर न पडणे, हलका आहार घेणे, पाणी भरपूर पिणे यांसारख्या खबरदारी बाळगाव्यात.

१७ एप्रिल रोजी पुण्याच्या विविध भागांमध्ये नोंदवले गेलेले तापमान असे होते – शिवाजीनगर ४०.५ अंश, पाषाण ४०.४ अंश, लोहगाव ४२.९ अंश, चिंचवड ३९.२ अंश आणि मगरपट्टा ४० अंश. यातील लोहगावमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!