Pune Zika Virus : पुण्यात झिकाने दोन जेष्ठांचा मृत्यू, प्रभाव वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन..

Pune Zika Virus : सध्या पुराच्या संकटात सापडलेल्या पुणेकारांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुण्यात झिका व्हयरसचे संकट गडद झाले आहे. पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात झिका बाधित असलेल्या दोन जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
त्यांना झिका बरोबरच इतरही व्याधी होत्या. त्यांना हृदयाचा आणि यकृताचा आजार होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झिका मुळे झाला की इतर कारणाने झाला याची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
तसेच याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिले आहे. रविवारी झिका चे आणखी ८ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. मृत्यू झालेले रुग्णाचे वय हे ७१ पेक्षा जास्त होते. त्यापैकी एक सह्याद्री हॉस्पिटल आणि दुसरा रुग्ण हा जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. Pune Zika Virus
त्याचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला होता. जोशी रुग्णालयातील रुग्ण वारजे येथील असून, १४ जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्या संबंधीच्या आजारांमुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते तर १९ जुलै रोजी त्यांच्या नमुन्यांमध्ये ‘झिका संसर्गा’ चे निदान झाले होते. दुसरा रुग्ण खराडी येथील असून, त्याला सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सेप्टिक शॉकमुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि सिस्टीमिक इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमही होता. त्याला २१ जुलै रोजी मृत घोषित करण्यात आले आणि २३ जुलै रोजी त्याला झिकाचे निदान झाले. शहरात आणखी ८ रुग्णांचा अहवाल झिकासाठी पॉझिटिव्ह आला असून, त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.