पुण्यातील कोंढावा परिसरात अनेक वाहने एकमेकांवर आदळून झाला मोठा अपघात; एकाच जागीच मृत्यू, दोन जखमी, वाहनांचे मोठे नुकसान
पुणे : पुण्याच्या कोंढवा परिसरात ४ ते ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली.
यामध्ये एक जण जागीच ठार झाला असून कार मधील तीन जण, तर स्कूल बस मधील पाच शाळकरी मुलं किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने स्कूल बससह दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात १ एकाचा मृत्यू झाला असून ३ ते ४ जण जखमी झाले. दरम्यान, या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.