Pune Weather Update : उकाड्यापासून पुणेकरांंना दिलासा मिळणार, मतदानाच्या दिवशी धो-धो पाऊस कोसळणार, जाणून घ्या…


Pune Weather Update : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्शभूमीवर मागील काही दिवसांपासून पुण्यात तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला होता. पुणेकर उकाड्यामुळे चांगलेच हैराण झाले.

मात्र पुढील काही दिवसांत पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी येत्या काही दिवसांसाठी हवामानाचा अलर्ट जारी केला असून, हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, ८ ते ११ मे दरम्यान हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे, दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत मुख्यत: स्वच्छ आकाश हळूहळू अंशतः ढगाळ होईल. तसेच १२ आणि १३ मे रोजी हवामानाला वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे अंशत: ढगाळ वातावरणामुळे वादळी वारे, वीज आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे सध्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तवला आहे. Pune Weather Update

दरम्यान, या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा होण्याची शक्यातादेखील वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांचंदेखील नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसापूर्वीच हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. सगळ्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता..

दरम्यान, १३ मेला पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी पावसाची आणि वादळीवाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे. मतदाराने काळजी घेवून मतदानासाठी हजेरी लावाली, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!