Pune Weather Update : पुणेकरांनो उन्हापासून काळजी घ्या! दोन दिवसात उन्हाचे चटके तीव्रपणे जाणवणार, दुपारी घराबाहेर पडू नका..
Pune Weather Update : पुढील दोन दिवस पुण्यात तापमानाचा तडाका वाढणार आहे. पुणे शहरासह उपनगरांमध्ये ४० अंशाच्या पुढे जाणार असण्याची शक्यता आहे. तसेच मागील काही दिवसांपासून पुण्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. त्यातच काल म्हणजेच १५ एप्रिलला पुण्यात सगळ्यात उष्ण दिवस दिवसाची नोंद झाली आहे .
पुण्यातील तापमानाने चाळीशी गाठली असून लोहेगाव परिसरातील तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. पुढील दोन दिवस पुण्यात तापमानाचा तडाका वाढणार आहे. पुणे शहरासह उपनगरांमध्ये ४० अंशाच्या पुढे जाणार असण्याची शक्यता आहे. रविवारी दिवसभरात पुण्यात या हंगामातील उच्चांकी ३९.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यांतील आयएमडीच्या आकडेवारीनुसार, यावर्षी एप्रिल २०२१३ नंतर तिसरा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. २०१९ मध्ये सरासरी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती; २०२२ मध्ये ३९.३ अंश सेल्सिअस; आणि यावर्षी ३९.२ अंश सेल्सिअस (१ ते १४ एप्रिल) तापमान होते. १५ एप्रिल रोजी रात्रीच्या तापमानातही लक्षणीय वाढ झाली. Pune Weather Update
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, शिवाजीनगर येथे २२. २ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाषाण, लोहगाव आणि मगरपट्टा या भागात किमान तापमान अनुक्रमे २२.५, २४.४ आणि २७.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.आरोग्याची काळजी घेण्यासाठी दुपारी बारा ते चार या वेळेत कारणाशिवाय उन्हात फिरायला जाणे टाळावे, हवामान विभागाने सल्ला दिला आहे.
उष्माघाताची कारणे काय?
काचेच्या कारखान्यात काम करणे.
उच्च तापमान खोलीत काम उष्माघात हा थेट उष्णतेच्या सतत संपर्कामुळे किंवा वाढलेल्या तापमानाच्या परिस्थितीमुळे होतो, जसे की घट्ट कपडे घालणे. –
घराबाहेर जास्त वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे.
उष्माघाताची लक्षणं काय?
थकवा, ताप, कोरडी त्वचा भूक न लागणे, चक्कर येणे, नैराश्य, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि अस्वस्थता, बेशुद्धी ही लक्षणं जाणवू शकतात.
उष्माघातावर उपचार काय?
रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कुलर खोलीत ठेवावे, वातानुकूलित खोली ठेवावी. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घाला रुग्णाच्या कपाळावर थंड पाणी ठेवावे, बर्फाचा पॅक लावावा आवश्यकतेनुसार इंट्राव्हेनस सलाईन द्या.