Pune : पुण्यात भयंकर परिस्थिती, चंद्रपूरपेक्षाही जास्त तापमानाची नोंद, उष्णतेच्या लाटेमुळे सगळेच हैराण..

Pune : पुण्यातील तापमानात सातत्त्याने वाढ झाली आहे. या उकाड्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आह. यामुळे उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान पुण्यात नोंदवलं गेलं आहे. पुण्यातील तापमान चंद्रपूरपेक्षाही जास्त आहे.
पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला. उन्हाच्या झळांमुळे सकाळपासूनच हैराण झालेल्या नागरिकांना वाढलेल्या तापमानाने घाम फोडला. उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरला ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. दरम्यान तळेगाव ढमढेरे येथे ४४, तर शिरूर येथे ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे हे सगळ्यात जास्त तापमान आहे. Pune
यामुळे ही एक चिंताजनक परिस्थिती आहे. तसेच सोलापूर येथे सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे बाहेर न पडण्याची माहिती देण्यात आली आहे. या उन्हाचा अनेकांना त्रास होत आहे. दररोज हंगामातील उच्चांक नोंदवला जात असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.
दिवसा उन्हाचा दाह, गरम वाऱ्याचा सामना करत आहेत. किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढला आहे. येत्या पाच मेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.