पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आता कात टाकणार! हडपसर ते यवत महामार्गाचा डीपीआर अंतिम टप्प्यात! राज्य सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : प्रचंड वाहतुक कोंडी व धोकादायक अवस्थेत असलेल्या पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (एन.एच. ६५) हडपसर ते यवत या टप्प्यावरील महामार्गांची पुर्नउभारणी व प्रस्थापित जागतिक किर्तीच्या धर्तीवरील इलिव्हेटेड प्रस्तावित मार्गांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा डीपीआर अंतिम टप्प्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडून या डीपीआरला अंतिम रुप देण्यात येत असून रस्ता सहापदरीकरणासह तीन मजली उड्डाणपूलासहीत मेट्रोचा अंतर्भाव करीत हा डीपीआर फेब्रुवारी अखेर राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याने हडपसर ते यवत महामार्ग कोंडी मुक्त व सुरक्षित होण्यासाठी पहिले पाऊल पडले आहे.

हडपसर ते यवत या ३१.५ किलोमीटरच्या महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सर्व्हेक्षण करून डीपीआर तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. २००४ साली बांधा ,वापरा , हस्तांतरीत करा या धर्तीवर कवडीपाट ते कासुर्डी तर कासुर्डी ते सोलापूर पर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करुन विस्तारीत करण्यात आला. त्यानंतर कवडीपाट ते कासुर्डी या महामार्गाची टोलवसुली मुदत २०१९ मध्ये संपल्यानंतर या महामार्गाची आवस्था देखभाल व दुरुस्ती या कारणांनी अतिशय धोकादायक झाली आहे. तसेच या महामार्गाभोवती वाढते शहरीकरण व लोकसंख्येने हडपसर ते यवत पर्यंत महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला असून हडपसर ते कवडीपाट पर्यंत शहरीकरणाचा बोजा तसेच कवडी ते यवत पर्यंत वाहतुकीसाठी रस्ता अतिशय धोकादायक व वाहतुक कोंडीने त्रस्त झाल्याने या महामार्गासाठी आ. राहुल कुल यांनी सातत्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या महामार्गाची पुर्नउभारणी व कोंडीमुक्त करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने मिळून हडपसर ते यवत पर्यंत हा महामार्ग इलिव्हेटेड विकसित करण्याचा धोरणानु सार या महामार्गाच्या पुर्नउभारणी करण्यास सुरुवात झाली आहे.

या प्रस्तावित मार्गांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महा मंडळाकडून डीपीआर चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्ते महामंडळाकडून हडपसर ते यवत दरम्यान ३१.५ किलोमीटर या अंतरावर तीन मजली उड्डाणपूल, मेट्रोचा अंतर्भाव व सहापदरी महामार्ग अशी रचना करण्यात आली आहे. काही ठिकाणी मार्ग एक्सिट व ऐंट्री अशी रचना करुन डीपीआर तयार करण्यात आला आहे. या डीपीआरला फेब्रुवारी अखेर राज्य शासनाकडे सादरीक रण करण्यात येऊन मंत्रिमंडळ पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय होऊन या महामार्गाच्या विकासाचा निर्णय होणार आहे.

आमदार राहुल कुल यांची भूमिका महत्त्वाची…

कवडीपाट ते यवत या महामार्गावरील इलिव्हेटेड उड्डाणपूलासाठी आ. राहुल कुल यांनी केंद्र व राज्य स्तरावर वेळीवेळी पाठपुरावा केला आहे.यापाठपुराव्याची फलनिश्चिती म्हणून हडपसर ते यवत विकासाला अंतिम रुप मिळाले आहे. परंतु आमदार राहुल कुल यांनी डीपीआरचे मंत्रिमंडळात सादरीकरण झाल्यानंतर निधीची तरतुद भूसंपादनाची प्रक्रिया व उभारणीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढील प्रक्रियेला गती दिल्यास हा मार्ग न रेंगाळता गतीने विकासाला मदत मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group