पुणे हादरलं!! निर्जनस्थळी बॉडी, हात-पाय बांधलेले अन् शीर गायब, पाहताच सगळेच हादरले….


पुणे : भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगांव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गम डोंगराळ भागात हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. गावातील गुराखी हे गुरे चारण्यासाठी डोंगराळ भागात गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी त्या परिसराची पाहणी केली. तेव्हा काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळून दिसला.

त्यांनी याबाबत माहिती तात्काळ भोर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

मृतदेहाचे शीर नसल्याने आणि हातपाय बांधलेले असल्याने हा खून विचारपूर्वक केला असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर शीर शोधण्यासाठी प्रयत्न केले. हा भाग दुर्गम आणि कमी वर्दळीचा मार्ग असल्याने येथे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे आव्हानात्मक आहे.

दरम्यान, हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ व्यक्त होत आहे. यामुळे पोलीस याबाबत तपास करत असून आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. या घटनेने परिसरात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!