पुणे रिंगरोड भूसंपादन कामाला मिळाली गती, सरकारकडून पुढील कार्यवाही सुरू…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे रिंगरोडबाबत कामे सुरू आहेत. आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. कामे उरकून घेतली तरच पुण्याची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित होईल. हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाली आहे. आता भूसंपादनासाठी पुढील कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे. पुण्यातून जाणाऱ्या अवजड वाहनांना शहराच्या बाहेरून वळविण्याचा उद्देश या रिंगरोडच्या माध्यमातून साध्य होणार आहे. यामुळे या कामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ज्यामुळे शहरातील ट्राफिक लवचिक आणि सुरळीत होईल. PMRDA च्या हद्दीतून जाणाऱ्या या रिंगरोडसाठी हवेली आणि खेड तालुक्यांतील एकूण ६७.३९ हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. यामध्ये अनेकदा मार्ग देखील बदलला गेला आहे.
आता भूसंपादनाच्या पुढील टप्प्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. हवेली तालुक्यातील आंबेगाव खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी यांसारख्या गावांतील जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. लोकांचा विरोध देखील आता मावळला आहे.
खेड तालुक्यातील सोळू, वडगाव शिंदे आणि निरगुडी गावातील जमिनीचीही मोजणी झाली आहे. या सर्व मोजणीच्या अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत. हवेली तालुक्यातील मोजणी पूर्ण झालेल्या गावांतील जमिनीचे हेक्टरमध्ये विवरण आंबेगाव खुर्द १०.८२, भिलारेवाडी १.६३, मांगडेवाडी १५.९४, निंबाळकरवाडी ३.७०, पिसोळी ५.४६, वडाचीवाडी १.६४. तर खेड तालुक्यातील सोळू १३.१७, वडगाव शिंदे ५.७१, निरगुडी ९.३२ हेक्टर जमिनीची मोजणी झाली आहे.
या विस्तृत मोजणीमुळे भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा नेमका आणि व्यवस्थित आढावा घेता येणार आहे. PMRDA च्या भूमी अभिलेख आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून हवेली आणि खेड तालुक्यातील जमिनीची तपशीलवार मोजणी केली गेली आहे.