पुणे रेव्ह पार्टी प्रकरण ; खडसेंच्या जावयाने ड्रग्ज घेतले? वैद्यकीय तपासणीत धक्कादायक खुलासा

पुणे : पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरातील फ्लॅटमध्ये शनिवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी छापेमारी करत रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण सात जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या छापेमारीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये दोन तरुणींचा देखील समावेश आहे. . छापेमारीत पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हुक्का साहित्य आणि मद्य आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जावयाने ड्रग्ज घेतले का? ही पार्टी अमली पदार्थाची होती का? असे प्रश्न उपस्थित झाले. यानंतर आता पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सात आरोपींच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आला आहे. ज्यात सातपैकी दोघांच्या रक्तात अल्कोहोल अर्थात दारुची मात्रा आढळली आहे. मात्र सातपैकी कुणीही ड्रग्जचं सेवन केल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं नाही. त्यामुळे ही खरंच रेव्ह पार्टी होती की मद्य पार्टी? याबाबत संशय निर्माण होताना दिसत आहे.वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात ७ पैकी २ जणांनी अल्कोहोलच सेवन केल्याची माहिती समोर आहे. आता सर्वांचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गांजा आणि इतर अमली पदार्थांचा साठा, मोठ्या प्रमाणात महागड्या दारूच्या बाटल्या, हुक्का पॉटस आणि त्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.