Pune Police MCOCA Action : गुंड अनुज यादवसह सहा जणांवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ११० संघटीत मोक्का कारवाई…

Pune Police MCOCA Action : चंदननगर परिसरात दहशत निर्माण करणार्या सराईत गुंड अनुज यादवसह त्याच्या सहा साथीदारांवर पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ११० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख अनुज जितेंद्र यादव (वय १९, रा. गंगोत्री निवास, वडगाव शेरी, पुणे), हरिकेश टुणटुण चव्हाण (वय १८, रा.आनंदपार्क, वडगाव शेरी), आकाश भारत पवार (वय २३, रा. वडगाव शेरी), अमोल वसंत चोरघडे (वय २३, रा. वडगाव शेरी), संदेश सुधीर कांबळे (वय २५, रा. वडगाव शेरी,) अक्षत निश्चल ताकपेरे (वय २०, रा. वडगाव शेरी), राहुल विनोद बारवसा (वय २३, रा. वडगाव शेरी) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत अनुज जितेंद्र यादव याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य करत १० वर्षांत खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे असे गुन्हे केले होते. Pune Police MCOCA Action
टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली.