Pune News : कॉलेजला दांडी मारून फिरायला गेले, पण ५ विद्यार्थ्यांसोबत घडल भयंकर, पुण्यात धक्कादायक प्रकार आला समोर..


Pune News : कॉलेजला बंक मारून फिरायला जाणं विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आहे. एस कॉलेजमधील ५ विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी मारुन मावळमधील कासारसाई धरणावर गेले होते. त्यातील एकाला जीव गमवावा लागला आहे.

सारंग रामचंद्र डोळसे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, थेरगाव येथील एम एस ज्युनियर कॉलेजचे पाच विद्यार्थी घरातील पालक आणि शिक्षकांची नजर चुकवून कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते. मात्र धरण परिसराचा आनंद घेत असताना धरणातील पाण्यात उतरून खेळण्याचा मोह या विद्यार्थ्यांना आवरला नाही. Pune News

पाण्यात खेळत असताना पाण्याच्या खोलीचा सारंगला अंदाज आला नाही आणि क्षणार्धात तो खोल पाण्यात वाहून गेला. सारंग बुडाल्याची घटना लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली, त्यांचा आवाज ऐकूण स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ, तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले.

रेस्कु टीमने काही वेळातच या विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिरगावं-परंदवाडी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!