५ लेकरांच्या आईच जावयासोबत लफड, पोलिस ठाण्यात प्रकरण पोहचताच कांड झालं…


उत्तर प्रदेश : पोलिस ठाण्यात नेहमी कौटुंबिक वाद, भांडणं आणि तक्रारींची प्रकरणं येतात; मात्र मैनपुरीत पोलिसांसमोर आलेलं एक प्रकरण ऐकून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. कारण प्रकरण होतं २० वर्षांच्या तरुणाचं आणि त्याच्या ३५ वर्षीय सासूचं! पाच मुलांची आई असलेल्या सासूसोबत राहण्याचा तरुणाचा हट्ट आणि त्यासाठी त्याने पोलिसांसमोर दिलेली उत्तरं सध्या चर्चेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीचं सुमारे दोन वर्षांपूर्वी निधन झालं आहे. ती महिला पाच मुलांसह राहत होती. याचदरम्यान तिची आणि जावयाची जवळीक वाढल्याचा दावा केला जात आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून दोघेही एकत्र राहण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली.

या कथित नात्याची माहिती महिलेच्या मुलांना मिळाल्यानंतर त्यांनी विरोध केला. मैनपुरीतील एका नातेवाईकाच्या कार्यक्रमातही यावरून कुटुंबात वाद झाला. परिस्थिती वाढत गेल्यानंतर अखेर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचलं आणि महिला व तरुणाला चौकशीसाठी पोलिसांसमोर आणण्यात आलं.

चौकशीदरम्यान पोलिसांनी तरुणाला त्याच्यासोबत असलेली महिला कोण आहे, असं विचारलं. त्यावर त्याने ती आपली सासू असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सासूसोबत लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न केला. यावर तरुणाने तिच्यासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.

‘पत्नीला राहायचं असेल तर तीही राहू शकते’

पोलिसांनी त्याच्या पत्नीचं काय होणार, असा सवाल केला असता तरुणाने पत्नीला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर राहू शकते, अन्यथा ती स्वतंत्रपणे जाऊ शकते, अशी भूमिका मांडल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याचं सांगितलं जात आहे. सासूच्या पाच मुलांची जबाबदारी कशी घेणार, असा प्रश्नही पोलिसांनी विचारला. त्यावर त्यांच्यासोबत राहू इच्छिणाऱ्या मुलांची काळजी घेण्याची तयारी त्याने दर्शवल्याची माहिती आहे.

दरम्यान, संबंधित महिलेनेही जावयासोबत विवाह करण्याची तयारी असल्याचं पोलिसांसमोर सांगितल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी दोघांचं समुपदेशन केल्यानंतर त्यांना घरी पाठवल्याची माहिती आहे.

मात्र, या प्रकरणात अधिकृत लेखी तक्रार दाखल झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला, तरी व्हिडीओतील सर्व दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!