मतदार यादीत नाव तपासण्यासाठी मिळाली नवी मुदत! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; अंतिम यादीची तारीखही ठरली!


पुणे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. आयोगाच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

तसेच, नोटीस टप्पा व दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!