Pune News : गडावर सेल्फी घेताना नवविवाह महिलेसोबत घडलं भयंकर, नवऱ्यासमोर फोटो काढला अन्…; घटनेने उडाली खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबळगड किल्ल्यावर सेल्फी काढताना एका २४ वर्षीय महिलेचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता.२८) रोजी घडली आहे.
शुभांगी पाटील असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी पुण्यातील दत्तवाडी येथील रहिवासी होती. शुभांगीचे विनायक पटेलसोबत ८ डिसेंबर रोजी लग्न झाले होते. हे दोघे हनिमूनसाठी निघाले होते. गुरुवारी सकाळी माची प्रबळगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले.
शुभांगी गडाच्या टोकावर सेल्फी काढायला गेली. सेल्फी काढताना तिचा तोल गेला आणि ती दरीत कोसळली. ही संपूर्ण घटना विनायक समोर घडली. या घटनेने विनायकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Pune News
दरम्यान, पनवेल तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडावरील काही ट्रेकर्स आणि सव्यंसेवी संस्थेच्या बचाव पथकाने शुभांगीला वर काडण्यात यश आहे. शुभांगीच्या अंगावर खूप जखमा होत्या . त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जीव गेला आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शुभांगीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. या घटनेने शुभांगीच्या कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.