Pune News : अश्लील बोलून महिलेचा विनयभंग, पतीला पोलीस चौकी बाहेर धमकी, दोन भावांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
Pune News पुणे : महिलेच्या मोबाईलवर मेसेज करुन तिचा पाठलाग करून तिच्यासोबत अश्लील बोलून गैरवर्तन केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिला तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेली असता तिच्या पतीला धमकी दिली. Pune News
हा प्रकार शनिवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास वाघोली येथे घडला. याप्रकरणी चंदननगर येथील दोन भावांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली येथे राहणाऱ्या २४ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (ता. १५) फिर्याद दिली आहे.
शिवाजी गहीणीनाथ बुधवंत (वय. ३२) व त्याचा भाऊ ईश्वर गहीणीनाथ बुधवंत (दोघे रा. आपले घर, खराडी बायपास, चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी शिवाजी याने फिर्यादी यांच्या मोबाईवर वारंवार एसएमएस करुन त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा पाठलाग करुन जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने फिर्यादी यांच्यासोबत अश्लील बोलून त्यांचा विनयभंग केला.
दरम्यान, याप्रकरणी महिला पतीसोबत तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेल्या. त्यावेळी शिवाजी याचा भाऊ ईश्वर याने पोलीस चौकीबाहेर महिलेच्या पतीला तक्रार केली तर तुला सोडणार नाही असे म्हणत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदे करीत आहेत.