Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला, डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ…


Pune News : पुणे शहरात झिका व्हायरससह डेंग्यूच्या धोक्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे डांसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

तर राज्यभरात झिकाचा धोका वाढला असून, झिकाची रुग्णसंख्या ही २५ वर पोहोचली आहे. तर झिकाचे सर्वाधिक म्हणजे २३ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत, पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

झिका व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. Pune News

झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील मोठी वाढ दिसून येत आहे. या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील १५६ रुग्ण हे या आठवडाभरातील आहेत.

त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती जागा शोधून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!