Pune News : धक्कादायक! सिंहगड रस्ता भागात वेटरचा खून, घटनेने उडाली खळबळ…


पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या परिसरात एका वेटरचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हा वेटर आंबेगाव बद्रुक परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुनीलकुमार राम आसरे (वय. २५, रा. चमका बनी, हरदोई, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकणी सुशीलकुमार (वय. २५, रा. गंगाई हाईट्स, आंबेगाव बुद्रुक) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलकुमार आणि सुशीलकुमार नातेवाईक आहेत. दोघे जण आंबेगाव बद्रुक परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला आहे. त्यांनतर, वडगाव बद्रुक परिसरात दांगट शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत सुनील कुमार मृतावस्थेत सापडला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनिल कुमारच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.सुनील कुमारच्या खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.

प्राथमिक चौकशीत वादातून त्याचा खून झाल्याची माहिती मिळाली असून, पसार झालेल्या आरोपींचा मार्ग काढण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!