Pune News : पुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा! सोसायटीचे गेट बंद केले अन्…


Pune News : पुण्यामध्ये एका मद्यधुंद तरुणीने चांगलाच राडा घातला. ही घटना वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. नशेत असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद करून उपद्रव केला. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. ठिकठिकाणी तरुण-तरुणींसोबत सर्वांनीच जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत केले आहे. या दरम्यान एका तरुणीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीमध्ये येऊन प्रचंड गोंधळ घातल्याची माहिती आहे. Pune News

या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओत तरुणी चांगलाच राडा घालताना दिसत आहे. हा राडा पाहून अनेक सोसायटीतील नागरिक भडकले होते. सगळे नागरिक सोसायटीत जमले होते.

दरम्यान, सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावल्यानंतर तिनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाणकरून तसंच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केल्याची माहिती आहे.

अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं. संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं तिला लगेच सोडून देण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ झाल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!