Pune News : धक्कादायक! चौकशीला बोलावले अन् केलं नको तेच कृत्य, महिलेला पोलीस ठाण्यातच विवस्त्र करून जबरी मारहाण, घटनेने पुणे हादरले….


Pune News : पुण्यात मुंढवा पोलीस स्टेशनध्ये एका महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून त्या महिलेला विवस्त्र करून दोन पुरुष आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. याप्रकरणी त्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण या पोलीस कर्मचाऱ्यांवर लावण्यात आलेली कलमं पुरेशी नसून, त्यांच्यावर कडक कलमे लावून संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावेतकर यांनी केली आहे.

या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीवर मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र तो सध्या फरार असल्याने त्याचा पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

या चौकशी दरम्यान दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या तीन वर्षाच्या बाळासमोरच तिला अश्लील शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर आपल्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणाची माहिती पीडित महिलेने शिवसेना शिंदे गटाचे महिला आघाडीला दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावेतकर यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ह्या मुंडवा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या. आणि या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांकडून याबाबत टाळाटाळ केली जात होती.

मात्र महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर मुंढवा पोलीस स्टेशनचे पुरुष पोलीस कर्मचारी करपे आणि गाडे त्याचबरोबर महिला कर्मचारी बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमं ही कमी प्रभावी आहेत. ती पुरेशी नसून त्यांच्यावर ३५४ दाखल करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावं अशी मागणी शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!