Pune News : बहिणीला त्रास देत होता भावजी, भावाने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुण्यात उडाली खळबळ…

Pune News : पुणे शहरातील बालेवाडी परिसरातील पाटील वस्तीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाला राग अनावर झाला. त्याने मित्राच्या मदतीने भावजीची हत्या केली. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र कुमार कांबळे (वय २४, रा. बालेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बाब्या व राहुल रिकामे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी एका १८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजेंद्र हा बिगारी काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच तो पुण्यात आला होता. बालेवाडी येथील पाटील वस्तीत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. Pune News
मृत राजेंद्र हा पत्नीला मानसिक त्रास द्यायचा इतकेच नाही, तर तिला मारहाण देखील करायचा. पती सतत मला मारहाण करतो, अशी तक्रार बहिणीने आरोपी भावाकडे केली होती
या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी भावाने बुधवारी रात्री बहिणीचे घर गाठले. तिथे मित्राच्या मदतीने त्याने भाऊजीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत राजेंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.