शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकत धक्काबुक्की; राजकीय वर्तुळात खळबळ..


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा येथे आयोजित कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे शुक्रवारी रात्री पुण्याकडे निघाले होते.

रात्री सुमारे दहाच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर विकास लवांडे यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!