Pune News : पुणे- सोलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जलवाहिनीच्या कामासाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग..

Pune News : पुणे-सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान एम. पी. पेट्रोल पंपाजवळ भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ही काम शुक्रवारी (ता.६) रात्री ८ वाजल्यापासून सुरू केले जाणार असून त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम हे दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिला टप्प्यात पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम केले जाणार आहे.
परिणामी पुणे- सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिलेली आहे. स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी आहे. Pune News
ही वाहने डावीकडे वळून बिशप सर्कल येथून उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याला जातील. हा सर्व मार्ग एकेरी करण्यात येत आहे. सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रस्ता, मम्मादेवी चौकमार्गे स्वारगेटकडे जाईल. त्यामध्ये कोणताही बदल नाही.
दरम्यान, सोलापूरवरून येणाऱ्या वाहनांना बंदी असून सदर वाहने ही सरळ मम्मादेवी चौक, गोळीबार चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी आहे. ही वाहने गोळीबार चौकातून सरळ आल्यावर उजवीकडे वळून लष्कर मार्गे इच्छित स्थळी जातील.