Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत मोठी कारवाई, ७ बांगलादेशी महिलांना अटक, ‘ते’ कारण सांगून थेट पेठेत आणलं..
Pune News पुणे : पुण्यात मागील काही वर्षांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असलेल्या ७ बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथाकाने सोमवारी (ता.९) बुधवार पेठेत छापा टाकून बांगलादेशींना अटक केली. Pune News
मागील काही दिवसांपासून पुण्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांवर पुणे पोलिसांची नजर आहे. बांगलादेशी महिलांवर कारवाईची सामाजिक सुरक्षा विभागाची एक महिन्यात तिसरी कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मागील चार वर्षापासून पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
बुधवार पेठेत राहणाऱ्या या बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्याचा कोणताही पुरावा नसल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे बुधवार पेठेतील कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांना सामाजिक सुरक्षा पथकाने केली अटक केली आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर पीटाअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. Pune News
आरोपी महिलांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय गस्ती पथकाची नजर चुकवून रात्रीच्यावेळी भारतात घुसखोरी केली. भारतात आल्यानंतर या महिला पुण्यातील बुधवार पेठेत अनिधिकृतपणे वास्तव्य करत होत्या.
पोलिसांना त्यांच्याकडे भारतात राहण्यासंबंधीचे कोणतेही कागदपत्रे आढळून आली नाहीत. बंगलादेशी महिलांविरोधात सामाजिक सुरक्षा विभागाने फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.