Pune News : चंदननगर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच प्रकार, गुन्हे शाखेने तपास केला अन् सगळेच हादरले, वेश्या व्यवसाय करून…
Pune News : चंदननगर परिसरातील एका स्पा सेंटर मध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. यावर पुणे पोलिसांच्या शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा मारून कारवाई करण्यात आली.
ही कारवाई खराडी परिसरातील शांतीनगर येथील इन्फिनिटी स्थाई स्पा येथे १ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली आहे
याप्रकणी चंदननगर पोलीस ठाण्यात शिवशंकर राजेंद्र थोरात (वय.२४ रा. इन्फीनीटी स्थाई स्पा, सीटी विस्टा बिल्डींग, दुसरा मजला, दर्गा रोड खराडी) याला अटक केली आहे.
तर विकास प्रजापती याच्या विरुद्ध आयपीसी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. Pune News
चंदननगर परिसरातील शांतीनगर येथे असलेल्या इन्फिनिटी स्थाई स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटर येथे छापा टाकला.
आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.