Pune News : पुणेकरांसाठी गडकरींची दिवाळी भेट! ३५ हजार कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प, ‘हे’ होणार बदल..

Pune News : पुणेकरांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास दिवाळी भेट दिली आहे. सुमारे ३५ हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना गुरुवारी (ता.९) मंजुरी दिल्याची माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी माध्यमांना ही माहिती दिली. यामुळे पुण्याच्या विकासात अधिकच भर पडणार आहे.

पुणे शहरात ४५ हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात दोन रस्ते प्रकल्प येणार आहेत. यामध्ये रस्ते उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेला मंजुरी मिळाली आहे. तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान नव्या महामार्गाची देखील घोषणा करण्यात आली आहे. Pune News
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे शहराच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

दरम्यन पुणे शहरातील समस्यासंदर्भात नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्पावर भर दिला जात आहे.

पुण्यात स्कायबसचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. स्काय बस, मेट्रो या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होणार आहे. तसेच पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेस इलेक्ट्रीक करण्यात येणार आहे.