Pune : महावितरणच्या कोरेगावमूळ उपकेंद्राला ‘आयएसओ’चेमानांकन, आतापर्यंत सात वीज उपकेंद्रांना प्रमाणपत्र…


Pune पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत कोरेगावमूळ ३३/२२ केव्ही उपकेंद्राने ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व परीक्षक ओंकार पत्की यांच्याहस्ते या उपकेंद्राला ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. योग्य निगा व गुणवत्तेसाठी पुणे परिमंडलातील आतापर्यंत सात वीज उपकेंद्रांनी ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

पुणे ग्रामीण मंडलमध्ये मुळशी विभाग अंतर्गत उरळीकांचन उपविभागातील कोरेगावमूळ ३३/२२ केव्ही उपकेंद्राने ‘आयएसओ’ मानांकनाचा प्रथम मान मिळविला आहे. या उपकेंद्राची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. Pune

आयएसओ ९००१:२०१५ च्या पथकाने पाहणी केल्यानंतर मानांकन जाहीर केले. उपकेंद्रांत झालेल्या कार्यक्रमात मुख्य अभियंताराजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे परीक्षक ओंकार पत्की यांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, मुळशीचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, सल्लागार यशवंत पत्की यांची उपस्थिती होती. Pune

‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी मुळशीचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंचाटे, उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहायक अभियंता रमेश वायकर, प्रधान यंत्रचालक रमाकांत सानप, यंत्रचालक अश्विनी चौगुले, सुभाष शेलार यांनी परिश्रम घेतले.

सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्तेनुसार ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले होते. त्यानुसार परिमंडलातील आतापर्यंत सात उपकेंद्रांनी ‘आयएसओ’च्या मानांकन मिळवले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!