Pune Hit and Run : पुण्यात पुन्हा हिट अँड रन: पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीसह चालकाला नेलं फरफटत, तरुण गंभीर जखमी…


Pune Hit and Run : पुण्यात काही दिवसांपुर्वीच कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणाने पुण्यासह राज्याला हादरवून सोडलं. अशातच पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड मध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आलं आहे.

पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच हा अपघात झाला आहे. कारचालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात ७ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोन दिवसानंतर या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघात ग्रस्त कार आणि कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जेव्हा कारचालक दुचाकीसह चालकाला फरफटत नेत होता तेव्हा आजुबाजूचे लोक कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. Pune Hit and Run

ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे. चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. घटनेच्या थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या तो तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर आता अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!