Pune : दुःखद! विजेची तार पाण्यात गेली, अन् नको तेच झालं, पुण्यात शॉक लागून महिलेचा मृत्यू…


Pune : विद्युत वायरचा शॉक लागून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली असून मृत महिलेचे वय ४० वर्षे आहे. मृत्युमुखी पडलेली महिला कोंढवा परिसरात राहायला होती.

नेमकं घडलं काय?

काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला बाहेर पडली होती होती. मात्र या परिसरात अशलेल्या डीपीमधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या.

या तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आल्या होत्या. परिणामी संपूर्ण परिसरात विद्यूत प्रवाह पसरला होता. याची मृत महिलेला कल्पना नव्हती. परिणामी घराबाहेर आल्यानंतर पाण्यातील तारा महिलेला दिसल्या नाहीत. या तारांचा स्पर्श महिलेला झाला. परिणामी विद्युत तारांच्या झटक्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. Pune

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डीपीच्या तारा बाहेर आल्या होत्या तर या परिसरातील प्रशासनाने त्याची दखल का घेतली नाही? डीपीची दुरुस्ती करण्यास विलंब का लावला? असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!