Pune : पुणे बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तात्रय पायगुडे बिनविरोध! उपसभापतीपदावरुन संचालकांच्या दोन गटांत मनोमिलन..!!

Pune उरुळीकांचन : पुणे (हवेली ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तात्रय यशवंत पायगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर पुणे बाजार समितीच्या सभापतीपदाच्या पदावरुन सुरू असलेल्या रस्सीखेचाच्या पार्श्वभूमीवर उपसभापतीपदी मनोमिलन झाले काय अशी चर्चा सुरू झाली असून उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने सभापतीपदासाठी दहा संचालकांनी अविश्वास ठराव आणणऱ्या गटाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पुणे बाजार समितीच्या सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात अविश्वास ठराव बारगळल्यानंतर अविश्वास ठरावाला विरोध करणाऱ्या एका संचालकाने उपसभापतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी काही लोकांना संपर्क केल्याने उपसभापतीपदाची निवडणूक रंगतदार होणार म्हणून रंगत निर्माण झाली होती.
तसेच सभापतींवर अविश्वास ठराव आणणारे काही संचालक उपसभाप तीपदासाठी दगाफटका घडू नये म्हणून बाहेरगावी गेल्याने आज होणारी निवडणूक बाजार समितीच्या दोन गटांत होणार म्हणून चर्चेला आली होती. मात्र अविश्वास ठरावाला विरोध करणाऱ्या ८ संचालकांनी उपसभापतीपदासाठी दत्तात्रय पायगुडे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतल्याने उपसभापतीपदासाठी दत्तात्रय पायगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दत्तात्रय पायगुडे यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
दरम्यान पुणे बाजार समितीच्या सभापतीपदावरून दोन गटांत प्रचंड रंगत असल्याचे चित्र हवेली तालुक्यात असून बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचेअधिकार काढून प्रकाश जगताप गटाकडे आले आहेत.परंतुसह्यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णयाला सभापती दिलीप काळभोर यांनी विभागीय सहकार निबंधक यांच्याकडे अपिल केल्याने या अपिलावर काय निर्णय घडतोय म्हणून हवेलीचे राजकारण चांगलेच चर्चेत आहे.