Pune Crime : सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीसोबत केले ‘ते’ कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना..

Pune Crime पुणे : सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार वाघोरी परिसरात घडला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी सावत्र पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी चिखली येथील सावत्र पित्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांचा दुसरा विवाह झाला आहे. तेव्हापासून अल्पवयीन ११ वर्षाची मुलगी आईसोबतच सावत्र पिता असलेल्या आरोपीच्या वाघोली येथील घरी राहत होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास मुलगी झोपेत असताना आरोपी तिच्या सोबत अश्लील चाळे करत होता.
ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कयद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.