Pune Crime : अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दबाव, सिंहगड रस्ता पोलिसांनी एकला ठोकल्या बेड्या..

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घातली. तसेच लग्नास नकार दिलातर आत्महत्या करण्याची धमकी देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन बेडया ठोकल्या आहेत.
याप्रकणी १७ वर्षीय पीडित मुलीने रविवारी (ता.१०) सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार रवि शिंदे (वय.२० रा. मानाजीनगर, वडगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु मला हो म्हण, नाहीतर मी फाशी घेईन, अेस म्हणून मुलीवर दबाव टाकून धमकी दिली. तसेच तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.