Pune Crime : पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! ९ वर्षांच्या मुलीला क्रूर बापाकडून धक्कादायक वागणूक, नराधम बापावर गुन्हा दाखल..


Pune Crime  पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

अंगावरील कपडे काढून एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसमोर अश्लील हातवारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न असे कृत्य करुन तिला क्रूर वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

आरोपीच्या या कृत्यामुळे तिच्या मनावार विपरीत परिणाम झाला आहे. हा प्रकार खराडी परिसरात मागील चार वर्षापासून पीडित मुलीच्या घरात घडला आहे. याप्रकणी पीडित मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ३६ वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा पती आहे. आरोपीने त्याच्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसमोर अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेत घरात फिरत होता. यामुळे मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होऊन तिच्या मनावर विपरीत परीणाम झाला. Pune Crime

तसेच तिच्या अंगाला अश्लील स्पर्श व अश्लील हातवारे करुन विनयभंग करुन हाताने मारहाण केली. तसेच तिच्या पायाला चटके देवून तिला क्रूर वागणूक दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याबाब पीडितेच्या मुलीच्या आईने तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेगर करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!