Pune Crime : शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ज्येष्ठाकडून अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अत्यााचर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ज्येष्ठ नागरिकाने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला धमकावले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आजीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मधुकर पिराजी थिटे (वय ७८, रा. धनकवडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिकाने सात वर्षांच्या मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने घरी नेले. त्याने मुलीवर अत्याचार केले. मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने मुलीच्या गळ्याला चाकू लावला. या घटनेची कोणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलीच्या आजीने फिर्यादीत म्हटले आहे. Pune Crime
दरम्यान, घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आजीला दिली. त्यानंतर बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे तपास करत आहेत.