Pune Crime : धक्कादायक घटनेने पुणे हादरलं! प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर बलात्कार, मुलगी गर्भवती अन्…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १९ वर्षाच्या तरुणावर विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ मध्ये लोहगाव येथे आरोपीच्या घरी घडला आहे. Pune Crime
याप्रकरणी येरवडा येथे राहणाऱ्या १८ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लोहगाव येथील अनिकेत विजय थोरात (वय.१९ ) याच्यावर आयपीसी गुन्हा दाखल करुन हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी अनिकेत थोरात याने फिर्यादी यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून तिला घरी नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच आपल्या प्रेमसंबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केले. पीडित तरुणी ७ महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.