Pune Crime News : दांडीया खेळताना चुकून दांडी लागली अन् झाला राडा! अल्पवयीन मुलाला ब्लॉकने मारहाण, तीन जणांवर गुन्हा दाखल..


Pune Crime News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. Pune Crime News

दांडिया खेळताना चुकून दांडी लागल्याच्या कारणावरुन तिघांनी एका अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झल्याची माहिती आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे ओंकारनगर चौकात शनिवारी (ता. २१) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे. Pune Crime News

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आदित्य उर्फ डापक्या (पूर्ण नाव माहित नाही), विशाल पवळे, गणेश कोठावळे (तिघे रा. ओंकारनगर, जाधववाडी, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा ओंकारनगर चौकात दांडिया खेळण्यासाठी गेला होता. दांडिया खेळत असताना त्याच्या तोंडओळखीचे मुले संशयितांना चुकून दांडी लागली. त्या कारणावरुन त्यांनी शिवीगाळ करत अल्पवयीन मुलाच्या तोंडावर, डोळ्यावर हाताने मारहाण केली.

तर गणेश कोठावळे याने रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा फुटपाथचा ब्लॉक मुलाच्या डोक्यात, कानावर, गालावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच जर तू आमच्या नादाला लागला तर तुला मारुन टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!