Pune News : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सट्टा जोरात, पोलिसांनी छापा टाकला, अन् बुकीने…


Pune News  पुणे : सध्या संपूर्ण जगामध्ये विश्वचषकाची रंगत पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. आता क्रिकेट प्रेमी प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी बुकींनी सट्टा बाजार जोरात सुरु केला आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. Pune News

याच विश्वचषकादरम्यान सट्टे बाजाराचा पर्दाफाश झाल्याचे समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा स्क्वाड पथकाने छापा टाकत या सट्टे बाजाराचा पर्दाफाश केला आणि चाळीस लाखांच्या रोख रकमेहस एकाला बेड्या ठोकल्या आहे.

पिंपरी कॅम्प आणि आसपासच्या परिसरात सट्टाचा बाजार अनेक स्पर्धेदरम्यान भरत असतो. क्रिकेट सामने, फुटबॉल, आयपीएल प्रिमीअर लीगमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल पिंपरी चिंचवडमधील सट्टा बाजारात होते. Pune News

आता नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी कोट्यावधींचा सट्टा पिंपरीत सुरु होता. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गुंडा स्कॉड पथकाने छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या छाप्यामध्ये बुकी दिनेश शर्मा याला पोलिसांनी अटक केली. दिनेश शर्मा यांच्या बेटिंगच्या घटनास्थळावर पोलिसांनी छापा टाकला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चाळीस लाखांची रक्कम दिसत आहे. तसेच दिनेश शर्मा पोलिसांसमोर गयावया करत असताना दिसत आहे.

ऑनलाइन जगात क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू या अ‍ॅपवर अनेकांना मोठ्या रक्कमेच आमिष दाखवले जाते. इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यात सट्टेबाजी या अ‍ॅपवर सुरु होती. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील एका घरावर छापा टाकला

. त्यानंतर दिनेश शर्मा याने यापुढे सट्टा खेळणार नाही. माफ करा. असे म्हणत असल्याचे दिसत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी त्याला अटक केली. घटनास्थळावरुन चाळीस लाख ऐंशी हजारांची रोकड जप्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!