Pune Crime News : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, उरुळी देवाची येथील घटना..

Pune Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला तिच्या घरातून पळवून नेले. यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी प्रियकरावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. .२४) सकाळी साडे अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथे घडली आहे. Pune Crime News
याप्रकणी आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या ५२ वर्षीय वडिलांनी (रा. राजुरी ता. पुरंदर) रविवारी (ता.२६) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी ता. पुरंदर जि. पुणे) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी आदित्य जाधव हे एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी आदित्य याने फिर्यादी यांच्या १९ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घरातून पळवून नेले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर पीडित मुलीने आदित्यकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठे जावून मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ असे बोलून तिला मानसिक त्रास दिला.
यामुळे फिर्यादी यांच्या मुलीला नैराश्य आले. दरम्यान, मुलगी उरुळी देवाची येथे मामाच्या घरी आली. तिने नैराश्यातून मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.