आर एम डी फाऊंडेशनद्वारा श्री तुळजा भवानी मंदिरासाठी प्याऊ जलप्रकल्प, आता भाविकांना मिळणार बाराही महिने थंड पिण्याचे पाणी…


तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यांना सुख सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात. भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, शुद्ध व थंड पिण्याचे पाणी बाराही महिने भाविकांना कायम मिळावे यासाठी आता एक निर्णय घेण्यात आला आहे.

आता रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा प्याऊ -जल प्रकल्प लोकार्पण करण्यात आला आहे. या निमित्ताने रुपये २६. ५० लक्ष निधीचा २००० लिटर क्षमतेचा आर ओ प्लांट उभारण्यात आला आहे. यामुळे मंदिराच्या चारही मजल्यावर सर्वच ठिकाणी थंड व शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध होणार आहे. याबाबत भावना फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी माहिती दिली आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी धाराशिव, तहसीलदार, कमांडंट श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, देवस्थानाचे जनसंपर्क अधिकारी, प्राचार्य श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, प्रदीप राठी, आकाश राठी अध्यक्ष लातूर अर्बन बँक, चंदकरण लड्डा, वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच लोकार्पण होत असलेले शोभाताई धारीवाल शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे महेश डोके व धनराज शिंदे पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर एम डी फाऊंडेशनद्वारा संपूर्ण भारतभर प्याऊ -शुद्ध व थंड पिण्याचे पाणी विविध ठिकाणी जसे शासकीय रुग्णालये, शाळा महाविद्यालय, सार्वजनिक उद्यानं, बाजारपेठा तसेच धार्मिक ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राणा जगजीत सिंह पाटील आमदार तथा विश्वस्त सदस्य यांनी मंदिरास प्याऊ जल प्रकल्प उभारून आर एम डी फाऊंडेशन द्वारे भाविकांची शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली याबाबत शोभाताई यांचा मंदिर प्रशासनाच्या वतीने सत्कार केला व आभार मानले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!