सर्वसामान्यांना महागाईचा झटका! घरगुती सिलींडरच्या दरात वाढ, आता इतके रुपये मोजावे लागतील, जाणून घ्या..


नवी दिल्ली : नव्या अर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात महागाईचा धक्का बसला आहे. लपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का दिला आहे. उद्यापासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने वर्षभर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नव्हता गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता.

त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. विशेष म्हणजे मार्च २०२३ नंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतही भाष्य केले आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लवकरच कमी होऊ शकतात असे सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, सिलेंडर दर वाढीच्या या निर्णयामुळे सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सध्या सिलेंडर ५०० रुपयाला मिळत असून त्याचा दर ५५० रुपये होणार आहे. तर मुंबईत सध्या गॅस सिलेंडर 810 रुपयांना मिळत असून त्याची किंमत ८६० रुपयांना मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!