Pune Crime News : दारुला पैसे न दिल्याने पत्नीचा साडीने आवळला गळा, पुण्यात धक्कादायक कृत्य..

Pune Crime News पुणे : पुण्यात अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली असून सध्या अशीच एक घटना उघडकीस अली आहे. दारु पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन साडीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
शिला संतोष शिरसाठ (वय ३०, रा. वारजे माळवाडी) असे महिलेचे नाव असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News )
याप्रकरणी तिचे वडिल माधव नारायण सूर्यवंशी (वय. ६०, रा. केदार बुडा, पो. कवाना, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष शिरसाठ (वय. ४०, रा. वारजे माळवाडी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, संतोष शिरसाठ हा मजुरी काम करतो. ते मुळचे नांदेडचे राहणारे आहेत. सुमारे दीड दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात रहायला आले. संतोष याने दारु पिण्यासाठी शिला यांच्याकडे पैसे मागितले. त्याला पैसे देण्यास शिला यांनी नकार दिला. तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली.
त्यानंतर संतोष याने शिला यांना शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साडीने त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून आजू बाजूचे तेथे आल्यावर त्यांनी शिला ह्यांची सुटका केली.
दरम्यान शिला यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिचे वडिल गावाकडून पुण्यात येऊन त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर संतोष शिरसाठ पळून गेला असून या घटनेचा पुढील पोलीस उपनिरीक्षक ओलेकर करीत आहेत.