Pune Crime News : पुण्यातील बुधवार पेठेत भर दिवसा महिलेची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर…


Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी एका महिलेचा भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. बुधवार पेठेत भरदिवसा झालेल्या या हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याप्रकणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

वर्षा थोरात असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले यांनी अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मृत वर्षा थोरातला दारूचे व्यसन होते. ती परिसरात फिरत असायची. आरोपी अब्दुल सय्यद याचा बुधवार पेठेत अंडा भूर्जीचा गाडा आहे. १०-१२ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल वर्षा थोरातने चोरल्याचा त्याला संशय होता. Pune Crime News

या संशयातून त्याने व त्याचा मित्र गौरवने तिच्याकडे मोबाईलबाबत विचारणा केली. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. रागाच्या भरात आरोपींनी वर्षाच्या डोक्यात काठीने मारहाण केली.

दरम्यान, घाव वर्मी बसल्याने थोरात खाली कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!