Pune Crime News : मुलीला रिझर्व्ह बँकेत नोकरी लावून देतो असे आश्वासन देत ४१ लाख उकळले, पुण्यातील घटना..

Pune Crime News पुणे : रिझर्व बँकेत किंवा सेबीमध्ये नोकरी लावण्याचा दावा करत एका व्यक्तीची तब्बल ४१ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना पुण्यामधून समोर आली आहे. याप्रकणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
गौरव पांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. (हा सगळा प्रकार जानेवारी २०२३ पासून सुरू होता.)
मिळालेल्या माहिती नुसार, पांडे आणि फिर्यादी यांच्या मुलीची ओळख एका विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झाली होती. आरोपीने तो इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमध्ये कमिशनर असल्याचं सांगत फिर्यादी यांना आरबीआयमध्ये पैसे गुंतवले तर दोन कोटी रुपये मिळतील असे सांगितले.
तसेच तुमच्या मुलीला रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा सेबीमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे आश्वासन देखील या व्यक्तीने फिर्यादींना दिले. मुलीच्या भवीतव्यासाठी फिर्यादी यांनी वेळोवेळी पांडे यांच्या नावावर पैसे जमा करायला सुरुवात केली. Pune Crime News
त्यांनी जवळपास ४१ लाख रुपये आरोपी व्यक्तीच्या खात्यावर जमा केले.मात्र मुलीला नोकरी लागत नसल्याने फिर्यांदींना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. या घटनेचा पुढील तपास पुसिंहगड रोड पोलीस करत आहेत.