Pune : मोबाईल ठरलं कारण! पत्नीने मागितला फोन, पैशांची जुळवाजुळव झाली नसल्याने पती हतबल, महिलेने घेतला टोकाचा निर्णय…

Pune : पुण्यात एका विवाहीत महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या आत्महत्येचं कारण ऐकल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोबाईल फोन न मिळाल्यामुळे विवाहीत शिवानीनं टोकाचं पाऊस उचलत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
शिवानी गोपाळ शर्मा (वय.२०) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
नेमकं घडलं काय?
शिवानी आणि गोपाळचे नुकतंच लग्न झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ पुण्यातील एका खासगी कंपनीत छोटीशी नोकरी करत होता. त्याची पत्नी शिवानी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याकडे नवा मोबाईल मागत होती. पण, गोपाळ त्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात संसाराचा कसाबसा गाडा हाकत होता.
तसेच त्याने तिला आपण नंतर घेऊ असे सांगितले. पण, शिवानी हट्टालाच पेटली होती. गोपाळने मोबाईल विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण पैशांची जुळवाजुळव काही होईना. त्याने शिवानीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण शिवानी ऐकतच नव्हती. तिचा हट्ट काही केल्या थांबत नव्हता. Pune
ज्यावेळी शिवानीचा हट्ट पूर्ण झाला नाही, त्यावेळी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पती गोपाळ कामावरून घरी परतला, त्यावेळी त्याला पत्नी लटकलेल्या अवस्थेत दिसली.
दरम्यान, यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीचा जबाबही नोंदवला. तपासानुसार, पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.