Pune Crime : संशयाच्या भूताने पछाडले, बायकोला सारखा फोन का करतो म्हणून मित्रानेच मित्रावर झाडली गोळी, घटनेने पुण्यात खळबळ..

Pune Crime : संशयाच्या भुताने पछाडलेल्या मित्रच मित्राच्या जीवावार उठल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्राच्या पोटात बंदुकीची गोळी पायर करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ माजली आहे.
शुभम तांबे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून त्याच्यावर यशवंत राव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजगुरूनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, पुण्याच्या खेड तालुक्यातील चांदुस गावात ही घटना घडली. जखमी शुभम तांबे आणि आरोपी हे दोघे जुने मित्र आहेत. मात्र आरोपीच्या बायकोला शुभम फोन करायचा. Pune Crime
त्याचा सारखा फोन येणे हे आरोपीला आवडत नव्हते. याच रागातून त्याने शुभमचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी आरोपीने शुभमला त्याच्या घरी बोलावले आणि तेथेच त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. आरोपीने बंदूक घेऊन शुभमच्या पोटात गोळी झाडली. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला.
दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकन आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला पिपरी चिंचवड येथील यशवंत राव चव्हाण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. राजगुरुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.