Pune Crime : हात पाय बांधून बॉक्समध्ये केलं पॅक, हडपसर येथे सापडला बॉक्समध्ये मृतदेह, घटनेने सगळेच हादरले….


Pune Crime : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोंढवा बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तर अशातच हडपसरमध्ये एका बॉक्समध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मृतदेह बॉक्समध्ये टाकून फेकून देण्यात आला होता. हडपसरमध्ये काल दुपारी ही घटना उघडकीस आली. एका अनोळखी इसमाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर या इसमाचा मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करण्यात आला. त्यानंतर हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी हा बॉक्स फेकून देण्यात आला होता. Pune Crime

स्थानिकांना जेव्हा हा बॉक्स आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली असता मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस अधिक तपास पोलीस करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!