Pune Crime : शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट तयार करून फसवणाऱ्या शाहरुख खानला बेड्या, जिल्हाधिकाऱ्यांचेही तयार केले होते बनावट अकाऊंट


Pune Crime पुणे : शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शाहरुख खानला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. Pune Crime

शाहरुख खान असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे सायबर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फि र्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. फिर्यादींना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली होती.

राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफमध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किंमतीत विकत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगीतले.

फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्स्फर केली. मात्र फर्निचर काही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील अलवर या ठिकाणी पथक पाठवून राजस्थान बहादुरपूर गावातून शहारुख खानला अटक केली.

दरम्यान , त्याची कसून चौकशी केली असता त्याने देशातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळले असल्याची कबुली दिली आहे.या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!