Pune Crime : उसने घेतलेले पैसे परत न केल्याने अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, पुण्यातील घटना…

Pune Crime : अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखीतून वेळोवेळी उसने घेतलेले पैसे परत द्यावे लागू नये, म्हणून एकाने महिलेचा मोबाईल चोरुन त्यातील अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकणी सहकारनगरमधील एका २८ वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय दादासाहेब देशमुख (रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती नुसार, फिर्यादी यांच्या पतीने अजय देशमुख याच्याशी ओळख करुन दिली होती. तिकीट बुकिंगच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये अजय देशमुख याने वडिल आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतले.
त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण ६ लाख ३० हजार रुपये उसने घेतले. ऑक्टोबर २०२१ मध्ये अजय देशमुख हा त्यांच्याकडे पैसे घेण्यासाठी आला तेव्हा त्यांचा मोबाईल गहाळ झाला. Pune Crime
त्यानंतर फिर्यादी या वारंवार अजयकडे पैसे परत देण्याची मागणी करु लागल्या. तेव्हा डिसेंबर २०२३ मध्ये अजयने इस्टाग्रामवर एक मेसेज पाठवून फोटो पाठविला. त्यात फिर्यादी यांचे सिझरिंगचे इन्फेक्शन झालेले प्रायव्हेट पार्ट दिसत होता. फिर्यादी यांनी डॉक्टरांना दाखविण्यासाठी त्यांनी हा फोटो काढला होता.
हा फोटो पाहून अजय यानेच आपला मोबाईल चोरल्याची त्यांची खात्री पटली. २४ जुलै २०२४ रोजी अजय देशमुख याने तो फोटो पाठवून गुगलवर फोटो व्हायरल करीन असे लिहिलेले होते. घेतलेले ६ लाख ३० हजार रुपये परत द्यावे लागू नये, म्हणून अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.