पुण्याचे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केली जात आहेत. यात आता पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या घटना घडत आहेत. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात.
त्यातच आता सायबर चोरट्यांनी चक्क गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नागरिकांना केले आवाहन..
रामनाथ पोकळे यांच्या नावाने काही परिचित नागरिकांनी चोरट्यांनी मैत्रीची विनंती पाठविल्याचे उघडकीस आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोकळे यांनी केले आहेत.